हळूहळू पसरणारा गडद अंधार

तानतणावामुळे मला नैराश्याचा आजार झाला आहे असं निदान जानेवारी २०१६-च्या सुरुवातीला करण्यात आलं होतं. माझं जीवन जणूकाही पूर्णपणे थांबलं होतं. मी आपल्या कुटुंबावर किंवा कामावर तक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. अंधाऱ्या ढगांनी माझ्या मनाला व्यापून टाकल्याची भावना माझ्या मनात होती. जीवनातील रोजची साधी कामं, जसं की जेवण करणं, झोपी जाणं, बोलणं, किंवा समस्या सोडवणं माझ्यासाठी डोंगराप्रमाणे मोठे वाटू लागले होते.

नैराश्याच्या आजारातील सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे हा आजार हळूहळू नकळतपणे माझ्या जीवनात पसरला होता. मत्रा याची कल्पना नव्हती की, माझ्यामध्ये जी लक्षणं जाणवत होती, जसं की विनाकारण थकवा जाणवणं, चीडचीड होणं, झोप न येणं, गोंधळूण जाणं, आणि अनुपस्थित मानसिकता ही नैराश्याची लक्षणं होती. आणखी एक लक्षण जे मला जाणवत होतं ते म्हणजे माझ्या जीवनातून आनंद आणि मनःशांती पूर्णपणे नाहिसे झाले होते.

मला इतकंच आठवतं की ऑफिसला जायला मला राग यायचा, कारण माझ्या नवीन जबाबदारीमध्ये काय समाविष्ट आहे ते किंवा व्यवसायातील लहान-सहान गोष्टीदेखील मी समजू शकत नव्हतो. एक प्रकारची भीती सतत माझ्या मनात असायची. मी ऑफिसमधून घरी यायचो तेव्हा मला चिंता वाटत असायची की कदाचित माझी नोकरी जाईल आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी माझ्याकडे मिळकतीचं कोणतंही साधन उरणार नाही. यामुळे परिस्थिती आणखीच वाईट झाली. रात्रीबेरात्री मला झोपेतून जाग यायची, माझ्या मनात सतत अस्वस्थता असायची, कधीच घडू न शकणाऱ्या गोष्टींची मी कल्पना करायचो. पुरेशी झोप न झाल्यामुळे पुढचा दिवस आणखीनच वाईट जायचा. असे-एक क्रूर चक्रच जणू सुरू असायचे.

माझं दुःख व्यक्‍त करण्याचा कोणताही मार्ग नव्हता.

माझ्या नैराश्याचं कारण नेमकं काय आहे हे त्या वेळी कळू शकलं नाही. पण आता मी जेव्हा मागं वळून पाहतो तेव्हा मला कळतं की त्यामागं अनेक कारणं होती, जसं की माझे काका, मग त्या पाठोपाठ त्यांचा मुलगा, जे मला अगदी जवळचे वाटायचे ते मरण पावले. माझं दुःख व्यक्‍त करण्याचा कोणताही मार्ग नव्हता. एक व्यक्‍ती, एक पती, एक पिता, आईवडिलांचा एकुलता एक मुलगा या नात्यानं मला मजबूत राहायचं होतं आणि कुटुंबाच्या भल्यासाठी मला कामावर जावं लागणार होतं.

त्याच दरम्यान, इतर आव्हाने कोटुंबिक आघाडीवर उद्भवली. माझ्या आईला डेंग्यू झाला होता, आणि तिच्या वयोमानानुसार हा आजार तिच्यासाठी जीवघेणा ठरू शकत होता. त्याच काळादरम्यान माझ्या सासूलाही गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त, एका नव्या नोकरीवर रुजू होऊन मला अगदी काहीच महिने झाले असल्यामुळे सोपविल्रेलं काम पूर्ण करण्याचा दबाव तीव्र होता.

मी आत्महत्या करण्याचाही विचार केला होता, पण माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचे काय होईल या चिंतेमुळे मी तो विचार सोडून दिला. मी एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवावं असं माझ्या प्रिय चुलतभावाची पत्नी, जी डॉक्टर आहे, तिनं मला सल्ला दिला. मी एका डाक्‍्टरकडे गेलो. त्या डॉक्टरनं मला काही औषधं लिहून दिली. त्या औषधांनी माझा आजार बरा होण्याऐवजी माझी तब्येत आणखीनच बिघडली. यामुळे मी आणखीनच गोंधळून गेलो. मी बरा होण्याऐवजी माझी स्थिती आणखी का बिघडत चालली असावी?

माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरनं मला सल्ला दिला की मी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावं. त्या मानसोपचार तज्ज्ञानं माझं म्हणणं लक्ष देऊन ऐकलं आणि काही नवीन औषधं लिहून दिली. या डॉक्टरनं धीर धरून माझं ऐकलं म्हणून मी माझ्या मनातील सर्वे भावना त्यांना सांगितल्या. हळूहळू मला बरं वाटू लागलं. जोपर्यंत मला आणि डॉक्टर दोघांनाही खात्री नव्हती की मला आता त्याची गरज नाही, तोपर्यंत वैद्यकीय हस्तक्षेप काही महिन्यांपर्यंत चालू राहिला.

याआधी मी कधीही अनुभवलं नव्हतं ते मला सापडलं-स्वीकृती.

याच काळादरम्यान, माझी पत्नी एका आध्यात्मिक समूहासोबत सहवास करत होती; मलादेखील तिनं आपल्यासोबत यायला सांगितलं. मन नसतानाही फक्‍त तिला खूश करण्यासाठी मी तिथं गेलो. खरंतर, हे लोक मला कशा प्रकारे मदत करू शकतील हे मला माहीत नव्हतं. पण, तिथं काही वेळा गेल्यावर, याआधी मी कधीही अनुभवलं नव्हतं ते मला सापडलं-स्वीकृती. मला स्वीकार करणाऱ्या लोकांच्या सहवासात असणं हा माझ्या जीवनात बदल घेऊन आला, ज्यामुळे मला एक व्यक्‍ती, एक पती, एक पिता म्हणून माझी खरी किंमत कळू लागली. आता मी नेहमी प्रयत्न करत असतो की माझ्या पत्नीला आणि मुलांना कळावं की ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत.

जर तुम्हीही नैराश्याच्या गडद अंधारात सापडला असाल, तर मला वाटतं की हा प्रवास तुम्ही एकट्यानं करणं जरूरी नाही. नैराश्यामुळे माणसं सहसा एकटे-एकटे राहू लागतात, पण याच्या अगदी उलट निराशेच्या गर्तेतून बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. आपले दुःख आणि आपल्या वेदनांबद्दल बोलण्याची गरज आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून, तुमची माहिती गोपनीय ठेवून तुमच्याबद्दल वाईट मत न बनवता मोफत तुमची कथा ऐकून घेण्यासाठी सल्लागार तयार आहेत. जर तुम्ही आपली संपर्काची माहिती खाली नमूद केली, तर एखादा सल्लागार लवकरच तुमच्याशी संपर्क करेल. तुम्ही स्वतःच्या खऱ्या किंवा खोट्या नावाने माहिती देऊ शकता. ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.

Photo Credit navneet mahajan

You don't have to struggle alone. Talk to a mentor, it's confidential.


You can connect with us privately on Facebook or send us a message using the form below and we will email you back. Speak to us in English, हिन्दी (Hindi), ਪੰਜਾਬੀ (Punjabi), or ગુજરાતી (Gujarati).

Your Gender:
Age Range:

We ask for gender and age to assign you the appropriate mentor. Terms of Service & Privacy Policy.

These struggles are difficult. If you’re considering harming yourself or others, please read this!